यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर

prashant damle
prashant damle
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर करण्यात आला आहे.

विष्णुदास भावे गौरव पुरस्काराचे यंदाचे हे ५६ वे वर्ष असून गौरव पदक, २५ हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या गौरव पदकाचे स्वरूप आहे. हा मानाचा पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. गेल्या ५५ वर्षापासून नाट्य क्षेत्रातील विविध कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news