मेलबर्न क्रिकेट मैदानावर विराटचा वाढदिवस साजरा

मेलबर्न क्रिकेट मैदानावर विराटचा वाढदिवस साजरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा आज ३४ वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर सपोर्ट स्टाफच्या वतीने त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. टी- २० विश्वचषकासाठी विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा रविवारी सामना आहे. त्या सामन्यापूर्वी सरावावेळी विराट कोहलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यादरम्यान, टीम इंडियाचे मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. दोघांनी मिळून केक कापला.

विराट सध्या ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळत आहे. कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली आहे. जगभरातील चाहते विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींनी कोहलीचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियातील चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त केक कापला. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहनी यानेही एक पोस्ट टाकली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) मध्ये त्याच्यासोबत खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सने त्याला व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी भारतीय संघातील खेळाडूंनी कोहलीसाठी सोशल मीडियावर पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news