Virat Kohli vs Pakistan : पाकस्तानविरुद्ध कोहली पाडतो धावांचा पाऊस! जाणून घ्या आकडेवारी

Virat Kohli vs Pakistan : पाकस्तानविरुद्ध कोहली पाडतो धावांचा पाऊस! जाणून घ्या आकडेवारी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानचे संघ प्रदीर्घ काळानंतर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ 2 सप्टेंबर रोजी आशिया चषकात भिडणार आहेत. हा वनडे सामना श्रीलंकेतील कँडी येथे खेळवला जाणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना झाला होता. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात टीम इंडियाच्या रन मशीन विराट कोहलीने (Virat Kohli) संस्मरणीय खेळी साकारली होती. पाकिस्तानविरुद्ध विराटची कामगिरी केवळ टी-20 मध्येच नाही तर वनडेमध्येही उत्कृष्ट आहे.

विराटची बॅट नेहमीच पाकिस्तानविरुद्ध तळपते (Virat Kohli vs Pakistan)

वनडे फॉरमॅटची चर्चा करायची झाल्यास कोहली (Virat Kohli) चार वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. वनडे विश्वचषकातील तो सामना इंग्लंडमधील मँचेस्टर येथे रंगला होता. कोहलीने त्या सामन्यात 77 धावा चोपून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याची बॅट नेहमीच पाकिस्तानविरुद्ध तळपल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विराटने त्याच्याविरुद्धच्या मागील चार एकदिवसीय डावांमध्ये तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. (IND vs PAK Asia Cup)

पाकिस्तानविरुद्धच्या वनडेत कोहलीच्या शेवटचे पाच डाव

2019 : मँचेस्टर : 77 धावा
2017 : ओव्हल : 5 धावा
2017 : बर्मिंगहॅम : नाबाद 81 धावा
2015 : अॅडलेड : 107 धावा
2014 : मीरपूर : 5 धावा

पाकविरुद्ध वनडे सामन्यात कोहलीची कामगिरी (Virat Kohli vs Pakistan)

विराटने 2009 ते 2019 पर्यंत पाकिस्तानविरुद्ध 13 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 13 डावात 536 धावा वसूल केल्या असून यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी 48.72 तर स्ट्राइक रेट 96.22 राहिला आहे. (IND vs PAK Asia Cup)

आशिया कपमध्ये पाकविरुद्ध विराटचे रेकॉर्ड (Virat Kohli vs Pakistan Asia Cup)

आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये कोहलीचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने 10 डावात 613 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तीन शतके आणि एका अर्धशतकाची नोंद आहे. या कालावधीतील विराटने 2010 मध्ये डंबुलामध्ये 18 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2012 मध्ये मीरपूरमध्ये 183 धावांची मोठी इनिंग खेळली होती. त्यानंतर 2014 मध्ये मीरपूरच्याच मैदानावर तो केवळ पाच धावा करून बाद झाला होता. अशा प्रकारे कोहलीने आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीन डावात 206 धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news