आचारसंहितेचे उल्लंघन : राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल

ए. वाय. पाटील
ए. वाय. पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ विनापरवाना रॅली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील यांच्यासह 40 जणांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रामुख्याने अविनाश पाटील, राजाराम पाटील, शिवानंद महाजन, दिनकर पाटील आदींचा समावेश आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ शहरातून रॅली काढून शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता.

शिवाय पुईखडी येथील मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा ही आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ए. वाय. पाटील यांच्यासह चाळीस जणांवर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news