Vikram-S Launching : भारतातीय अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरूवात; ‘विक्रम एस’ या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

Vikram-S Launching
Vikram-S Launching
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ क्षेत्रात आज नव्या युगाची सुरूवात होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) माध्यमातून 'विक्रम एस' या पहिल्या खासगी रॉकेटचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील केंद्रातून भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता हे रॉकेट अवकाशात झेपावले. स्कायरूट एरोस्पेस प्रा.लि या खासगी कंपनीकडून या रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे.

स्कायरूट एरोस्पेसच्या या पहिल्या मोहिमेला 'प्रारंभ' असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये तीन ग्राहक पेलोड असणार आहेत. स्कायरूटसाठी हे मिशन एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण पुढील काही वर्षात प्रक्षेपण नियोजित कार्यक्रमात याचा शास्त्रज्ञांना मोठा फायदा होणार आहे. विक्रम-१ ऑर्बिटल वाहनामध्ये वापरल्या जाणार्‍या ८० टक्के तंत्रज्ञानाची पडताळणी करण्यात हे प्रक्षेपण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

देशाच्या अंतराळ उद्योगात अनेक दशकांपासून इस्रो या सरकारी संस्थेची मालकी आहे. इस्त्रोकडून तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्रेच आजपर्यंत श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली आहेत. पण आज 'विक्रम एस' हे स्कायरूट एरोस्पेस प्रा. लि ने तयार केलेले खासगी रॉकेट इस्त्रोच्या श्रीहरिकोटा येथील केंद्रातून अवकाशात झेपावले. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचे नाव ठेवण्यात आले आहे. या प्रक्षेपणाने अवकाश संशोधनात आता खासगी कंपन्यांचे अस्तित्व असणार हे याद्वारे चिन्हांकित झाले आहे.

अंतराळ उद्योगातील 'स्कायरूट एरोस्पेस' पहिली कंपनी

इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, भारतातील खासगी क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप आहे. रॉकेट लॉन्च करण्यासाठी अधिकृत असलेली पहिली भारतीय कंपनी बनल्याने त्यांनी स्कायरूट या अंतराळ उद्योगातील कंपनीचे अभिनंदनही केले आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने अवकाश उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंतर स्कायरूट एरोस्पेस ही भारतीय अंतराळ कार्यक्रमात पाऊल टाकणारी भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news