INDIA Alliance Meeting Mumbai | इंडिया बैठकीत काय घडलं, विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

Maratha reservation
Maratha reservation
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या लोगोचं आज अनावरण होणार नाही. लोगोचं अनावरण पुढे ढकललं आहे. नवीन घटक पक्षांसोबत लोगोबाबत चर्चा करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. (INDIA Alliance Meeting Mumbai) इंडिया आघाडीची पुढची बैठक तामिळनाडूत होणार असल्याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, विरोधकांना विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या सहा मुख्यमंत्री हे तटस्थ भूमिकेत आहेत. त्यांचे निर्णय अजून झालेले नाहीत. बैठक होताहेत, आम्ही एकत्र येत आहोत.

इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. वन नेशन वन इलेक्शनसाठी विरोधी पक्षाला विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. बैठकांचा धक्का भाजपने घेतल्याचे ते म्हणाले. एक दोन बैठकांनंतर गॅस ५०० रुपयांनी कमी होईल, अशी उपहासात्मक कोपरखळी त्यांनी मारली. इंडिया आघाडीच्या बैठकीचा धसका घेऊन समिती स्थापन केली असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. 'इंडिया'च्या घटकपक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी रात्री 'डिनर डिप्लोमसी' केली. यावेळी झालेल्या प्राथमिक चर्चेत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना 'इंडिया' आघाडीचे संयोजक करावे, असे सुचविण्यात आले. काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख पक्ष आहे. 'इंडिया' आघाडीचे नेतृत्व हे काँग्रेसकडे असले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर काँग्रेस हा मोदी यांच्याविरोधात प्रमुख चेहरा असला पाहिजे, तर मतदार 'इंडिया' आघाडीला गांभीर्याने घेतील, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news