Baramati Vijay Shivtare : विजय शिवतारेंचे बंड अखेर थंड; बारामती लोकसभेतून माघार

विजय शिवतारे
विजय शिवतारे

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आव्हान उभे करणारे शिंदे गटाचे नेते व माजी आमदार विजय शिवतारे यांनी अखेर बारामती लोकसभेतून माघार घेतली आहे. सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू, अशी घोषणाही त्यांनी आज (दि.३०) केली. कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  Baramati Vijay Shivtare

शिवतारे पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि पुरंदर जनतेच्या विकासासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. जो निर्णय असेल तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत. माझे आयुष्य किती आहे हे मला माहित नाही. मी अनेक आजारांनी त्रस्त आहे. हे लक्षात घेता, जनतेचे हित मी जोपासायचे ठरवले आहे. निवडणूक न लढता आपल्या मागण्या मान्य होत आहेत. दीड लाखांचे लीड पुरंदर तालुक्यातील महायुतीला द्यायचे आहे, असे आमचे ठरले आहे. Baramati Vijay Shivtare

5 लाख 80 हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावे लागेल. १५ ते २० लोकसभा उमेदवार पडू शकतात. असे मला सांगण्यात आले. यामुळे महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गुंजवणी धरण, भोर साठी महत्वाची असलेल्या तीन उपसा सिंचन, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हस्तगत करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी स्वेच्छा खरेदी जाहीर करा, दिवे येथे 200 एकर वर राष्ट्रीय बाजार उभारा, फुरसुंगी-उरुळी देवाची येथे नगरपरिषद निर्माण करावी, दुष्काळग्रस्त भागासाठी वरदायिनी ठरणारी पुरंदर उपसा योजनेसाठी तातडीने निधी मिळणार आहे, अशा अनेक मागण्या मान्य झाल्याच्या शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news