Mrunal Thakur : गीता गोविंदमच्या दिग्दर्शकाचा विजय देवरकोंडासोबत मोठा धमाका, VD13 लवकरचं

mrunal thakur-vijay
mrunal thakur-vijay

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुर यांची जोडी लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. परसुराम पेटला हे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. (Mrunal Thakur) परसुराम यांनी सुपरहिट गीता गोविंदम चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर दिल राजू आणि सिरीश चित्रपटाची निर्मिती करत आहेत. वासू वर्मा चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. तर गोपी सुंदर यांचे संगीत आहे. विजय देवरकोंडा आणि परसुराम गीता गोविंदम चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करायला तयार आहेत. (Mrunal Thakur)

निर्माते श्याम प्रसाद रेड्डी यांनी फर्स्ट शॉटचे क्लॅप कले. यावेळी पूजा सोहळा ठेवण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news