गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला होता. तो खरा ठरवत मंगळवार ९ एप्रिलपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप कयम आहे. ९ व १० एप्रिल दोन दिवस रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास वादळी पावसाने मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली असता गुरुवारी सकाळपासून दिवसभर पावसाची रिपरिप असताना काल, शुक्रवारी व आज शनिवारी पुन्हा पहाटेपासून शीतलहरीसह तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. एकंदरीत अवकाळी पावसाने जिल्ह्यात जणू मुक्कामच ठोकला असून भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव गोंदियाकरांना येत आहे. (Vidarbha Rainfall)