Chhava Movie : छ. संभाजी महाराजांच्या लूकमधील विकी कौशलचे फोटो लिक

Vicky Kaushal
Vicky Kaushal

पुढारी ऑनलाईन डेस्क : छावा चित्रपटाच्या सेटवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमधील विकी कौशलचे फोटो समोर आले आहेत. (Chhava Movie) विकी कौशलसोबत रश्मिका मंदानाची भूमिका असल्याचे कळते. लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आता छावा या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवरून फोटो लिक झाले आहेत. या कपलचे फोटो एक्स अकाऊंटवरून व्हायरल झाले आहे. (Chhava Movie)

संभाजी महाराजांच्या वेशभूषेत, पारंपरिक दागिने आणि केसांचे डोक्यावर बन (शिवाप्रमाणे केसांचे बन) असा विकीचा लूक दिसतो आहे.

photos –  VK – x अकाऊंटवरून साभार

लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, तर रश्मिका चित्रपटात त्यांची पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news