vegetables : १ तोळे सोन्याच्या किमतीपेक्षाही महाग आहे ही भाजी!

vegetables : १ तोळे सोन्याच्या किमतीपेक्षाही महाग आहे ही भाजी!
Published on
Updated on

नवी दिल्ली : (vegetables) एखादी भाजी महाग असून असून किती असेल? पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात महाग हिरवी भाजी चक्क किलोला 82 हजार रुपये दराने विकली जाते. म्हणजे दोन तोळे सोने किंवा दोन किलो चांदीची किंमत भाजीसाठी मोजावी लागते.

हॉप शूटस् या नावाने ही भाजी ओळखली जाते. हिचा जागतिक बाजारातील दर किलोला एक हजार युरो असा आहे. या भाजीची फुलेही आहारात वापरली जातात. त्यांना हॉप कॉर्न असे म्हटले जाते. फुलांचा वापर प्रामुख्याने बीअरसाठी केला जातो तर बाकी देठ खाण्यासाठी वापरली जातात. ही भाजी म्हणजे औषधी गुणांचे भांडार समजले जाते. दाताची दुखणी, टीबीसारख्या व्याधी तिच्या सेवनाने बर्‍या होतात. देठांचा वापर सॅलडमध्ये केला जातो. लोणचेसुद्धा बनवतात. खिस्तपूर्व 800 शतकापासून या भाजीची माहिती लोकांना होती आणि तिचा आहारात वापर केला जात होता. उत्तर जर्मनीत तिची शेती प्रथम सुरू झाली. भारतात लाहोल स्पिती जिल्ह्यात तिची शेती केली जाते. मात्र आपल्याकडे या भाजीला फार ग्राहक नाहीत. (vegetables)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news