योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत वीणा जगताप महत्वपूर्ण भूमिकेत

veena jagtap
veena jagtap
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सन्मार्गास लोका लावीत ! लीला आमच्या विचित्र! सर्वत्र संचार आमचा होत! आलो नंतर सोलापुरात! कलर्स मराठीवर सुरू असलेल्या योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत आपण शंकर महाराजांनी केलेल्या अनेक लीला बघत आहोत, अनेक भकत्तांचा उद्धार त्यांनी कसा केला हे पाहिले, तर चुकलेल्या माणसांना योग्य मार्ग कसा दाखविला हे देखील पाहिले. पण, आता आपल्याला बघायला मिळत आहे सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा न ऐकलेला, न वाचलेला अद्भुत अध्यात्मिक प्रवास. बाल शंकर ते शंकर महाराज हा प्रवास बघणे उत्सुकतेचे असणार आहे. याचनिमित्ताने मालिकेत वीणा जगताप महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

योगदायिनी पार्वती माता ही अखिल जगाची जननी, सर्व योग तिच्या ठायी आहेत, योगेश्वर आदिनाथाची ती अर्धांगिनी, लहानग्या शंकरला बालवयातच अंजनी, जगदंबा, अन्नपूर्णा या रुपात दर्शन व आशीर्वाद देऊन पुढील अखंड आयुष्याच्या यात्रेसाठी सक्षमता प्रदान केली. मालिकेत आपल्याला लवकरच पार्वती मातेची पाच रूपं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते साकारणार आहे वीणा जगताप.

वीणा जगताप म्हणाली, "माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक आणि उत्सुकतेचे होतें मी पहिल्यांदाच देवी रुपात तयार होऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतकेच नव्हे तर त्यातही वेगवेगळी रूपं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. खूपचं कठीण होतं हे माझ्यासाठी. एकतर पहिलीच वेळ होती बघताना खूप सोपं वाटतं आपल्याला पण ते साक्षात साकारणं तितकचं अवघड होतं. तयार होण्यासाठी लागणारा वेळ खूप होता. मला आधी खूप भीती वाटतं होती जमेल की नाही पण मी भाग्यवान समजते स्वतः ला की मला ही संधी मिळाली. मला खात्री आहे प्रेक्षकांना देखील नक्की आवडेल."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news