ब्लॉकबस्टर ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर यादिवशी

ved movie
ved movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलिया देशमुख निर्मित वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. सिनेमातले संवाद, गाणी आणि महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थात रितेश आणि जेनिलिया देशमुख या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. प्रेमातला हा वेडेपणा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आलीय. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांना पाहता येईल.

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश देशमुख म्हणाले, 'महाराष्ट्राचा लाडका सिनेमा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे याचा आनंद आहे. वेड सिनेमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांचा लाडका सिनेमा आता घरबसल्या कुटुंबासोबत स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळणार आहे. थिएटर बाहेर ज्याप्रमाणे हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत होते तोच दिलखुलास प्रतिसाद वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला मिळेल याची मला खात्री आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news