Vasantdada Patil : “माझ्या शेतकऱ्यांचे रान…”आव्हाडांनी शेअर केली वसंतदादांची आठवण

Vasantdada Patil
Vasantdada Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज (दि.१३)  जयंती. यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री असतानाची आठवण त्‍यांनी शेअर केली आहे.  (Vasantdada Patil)

महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बंडूजी आणि रुक्मिणीबाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी १३ नोव्हेंबर १९१७ रोजी पद्माळे गावी झाला. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना सहकारमहर्षी म्हणून ओळखले जाते. वसंतदादा पाटील य़ांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण पदांचा कारभार सांभाळला.

Vasantdada Patil : माझ्या शेतकऱ्यांचे रान…

वसंतदादा पाटबंधारे मंत्री हो तेव्हाची एक आठवण जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'X' खात्यावर शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्र राज्याला अनेक दैदिप्यमान आणि वैचारिक मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभला आहे. एक किस्सा असा होता, वसंतदादा तेव्हा पाटबंधारे मंत्री होते आणि श्री. चाफेकर हे त्यावेळी मुख्य अभियंता होते. ते नेहमी कोणत्या जलाशयात किती पाणी आहे याची माहिती घेत असत. कोणत्या खोऱ्यात किती….कोणत्या खोऱ्यात किती अशी सतत विचारणा चालूच असे. तेव्हा एकदा दादा म्हणाले, "अहो चाफेकर टी.एम.सी, घनफूट असे सांगू नका. माझ्या शेतकऱ्यांचे रान किती एकराने भिजल ते फक्त सांगा."

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news