Australia : ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड

Australia : ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबर्नमध्ये दोन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमळे आम्हाला धक्का बसला आहे आणि आमचे अधिकारी याची चौकशी करत आहेत, अशी माहिती भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी ट्विट करून दिली. त्याचबरोबर त्यांनी मेलबर्नमधील दोन हिंदू मंदिरांच्या तोडफोडीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे बहुसांस्कृतिक देश आहेत. मेलबर्नमधील दोन हिंदू मंदिरांच्या तोडफोडीमुळे आम्हाला धक्का बसला असून ऑस्ट्रेलियन अधिकारी चौकशी करत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ऑस्ट्रेलियात काही मंदिरांची तोडफोड झाली आहे. या कृत्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. या कृतींचा ऑस्ट्रेलियन नेते, समुदाय नेते आणि तेथील धार्मिक संघटनांनी जाहीर निषेध केला आहे.

एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, खलिस्तानी समर्थकांनी ऑस्ट्रेलियातील एका हिंदू मंदिराची सोमवारी तोडफोड केली आहे. व्हिक्टोरिया राज्यातील मंदिरावर आठवड्याभरात हा दुसरा हल्ला आहे. कॅरम डाउन्स, व्हिक्टोरिया येथील ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिरात भाविक दर्शनासाठी आले असताना तोडफोड करण्यात आली, असे द ऑस्ट्रेलिया टुडे वेबसाइटने वृत्त दिले आहे.

श्री शिव विष्णू मंदिराच्या भक्त असलेल्या उषा सेंथिलनाथन म्हणाल्या की, आम्ही ऑस्ट्रेलियात तमिळ अल्पसंख्याक गट आहोत. धार्मिक छळापासून वाचण्यासाठी बरेच जण निर्वासित म्हणून येथे आले होते. हे माझे श्रद्धास्थान आहे. खलिस्तान समर्थक कोणतीही भीती न बाळगता द्वेषाने मंदिराची तोडफोड करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news