vaishali takkar :राहुल नवलानीने वैशालीच्या ‘त्या’ फोटोंवरून केलं ब्लॅकमेल

Vaishali Takkar
Vaishali Takkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या मृत्यू प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होत आहेत. राहुल नवलानी अटकेत आहे. त्याची चौकशी सुरू असून चौकशीत त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पोलिसांनी खुलासा केला की, राहुलच्या फोनमध्ये वैशालीचे काही खासगी फोटो फोटोज आणि व्हिडिओज होते. दरम्यान, पोलिसदेखील अचंबित आहेत की, अखेर राहुल आणि त्याची पत्नी वेगवेगळे फरार का झाले?

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी राहुल नवलानीला अटक करण्यात आलीय. इंदौर पोलिस आणखी गतीने तपास करत आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की, राहुल नवलानी देवासहून इंदौरकडे चालला आहे. तेव्हा पोलिसांनी राहुल नवलानीला ताब्यात घेतलं. पोलिस आता राहुल नवलानीची चौकशी करत आहेत. त्याचा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देखील जप्त करण्यात आला आहे. राहुल नवलानीची चौकशी केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत, याबाबत इंदौर पोलिस कमिश्नर हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, पोलिस आरोपी राहुल नवलानी (Rahul Navlani) ला रिमांडवर घेऊन चौकशी करत आहे. त्याचा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आला आहे. राहुलच्या फोनमध्ये Vaishali Takkar चे खासगी फोटो आणि व्हिडिओज होते. त्यावरून राहुल वैशालीला ब्लॅकमेल करत होता.

पोलिस गोळा करत आहे पुरावे

मिश्रा यांनी सांगितलं की, 'याप्रकरणी एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली आहे. आरोपीकडे वैशाली ठक्करचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओज होते. हे फोटोज त्याने दुसऱ्या तरुणाला (ज्याच्यासोबत वैशालीचे लग्न होणार होते) पाठवले होते. पोलिस याप्रकरणी सर्व साक्षीदार गोळा करत आहेत. डेटा लॉक वगैरे, पोलिस सायबर लॅबच्या संपर्कात आहेत.' पोलिस अद्यापही ते मेसेज आणि व्हिडिओ शोधत आहेत, जे दुसऱ्या तरुणाला पाठवून वैशालीवर दबाव आणला जात होता. तो पोलिसांची दिशाभूल करत असून तपासात सहकार्य करत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news