सा रे ग म प लिटिल चॅम्प : संगीताने मला निवडलं आहे-वैशाली माढे

वैशाली माढे
वैशाली माढे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पर्धक ते परीक्षक झालेली एक गुणी गायिका वैशाली माढे हिने सा रे ग म प लिटिल चॅम्प विषयी गप्पा मारल्या. यावेळी तिने या शोविषयी भरभरून सांगितले आहे.

झी मराठी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्प शोविषयी ती म्हणाली, झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प हा असा शो आहे ज्या शोने महाराष्ट्राला पंचरत्न मिळवून दिले. सा रे ग म प चा मंच एक असा मंच आहे ज्याने अनेक गायक घडवलेत. ह्या मंचावरचा माझा प्रवास सुद्धा एक स्पर्धक म्हणून झाला. असाच एका नवीन सीझनचा मी भाग होत आहे, मला खूप आनंद झाला आहे.

या पर्वातल्या छोट्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या १५ वर्षातला जितका माझा अनुभव आहे आणि माझ्यापरीने त्या मुलांना जितकं चांगलं मार्गदर्शन करता येईल ज्यामुळे त्यांच सादरीकरण सुधारेल याहून माझ्यासाठी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीही नसेल. कारण आता जरी मी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरी याआधी मी एक स्पर्धक होते हे कधीच विसरणार नाही.

गायिका बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली याविषयी वैशाली म्हणतेकी, मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे. माझ्या गाण्याने मला जन्माला घातलं आहे.

माझ्यासाठी संगीत हे सर्वस्व आहे. वडिलांकडून गाण्याचा वारसा निश्चित मिळालेला आहे. पण जिद्द मेहनत आणि खूप कसोट्यांवर मात करून मी आज इथे पोचलेली आहे, आणि माझं जे संगीत आहे, जे जगणं आहे, त्या जगण्यातून मला अनेकदा प्रेरणा मिळालेली आहे. आतापर्यंत माझा संघर्ष हीच माझ्या जगण्याची प्रेरणा राहिलेली आहे.

गायिका म्हणून तिचा प्रवास कसा घडला, याविषयी ती म्हणते-एक कलाकार म्हणून माझ्यावर प्रभाव टाकणारे सर्वात मोठे समर्थक किंवा मार्गदर्शक म्हणजे माझे गुरुजी सुरेश वाडकर जी. जे आता ह्या पर्वात गुरुजींच्या भूमिकेत असणार आहेत. सा रे ग म प जिंकल्यानंतर सुरेशजी हेच माझ्या संगीताला वळण देणारे एकमेव गुरू होते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या गुरूंचे स्थान वेगवेगळे असतं, आपल्या जीवनात गुरूचे महत्त्व शब्दांत व्यक्त करता येत नाही. आईनंतर जर कोणी आपल्याला सारे शिकवणारे असेल तर तो आपला गुरू असतो. या संगीताच्या प्रवासात मला दृष्टी देणारे माझे गुरुजी ते आहेत सुरेशजी वाडकर.

'गाणे असे की एकत्र येतील सारे'! 'सा रे ग म प लिटिल चॅम्प' ९ ऑगस्टपासून झी मराठीवर पाहता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news