कर्करोग, हृदयविकारावर येणार लस

कर्करोग, हृदयविकारावर येणार लस

लंडन : जगभरात कर्करोग आणि हृदयविकाराचे अनेक रुग्ण आहेत. या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत अशा आजारांवर मात करण्यासाठी प्रभावी लस येऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.

'द गॉर्जियन'मधील एका रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सर्व अटी पूर्ण करून अशी लस 2030 पर्यंत येऊ शकते. 'मॉडर्ना' या औषध कंपनीचे मुख्य चिकित्सा अधिकारी पॉल बर्टन यांनी सांगितले की अनेक गंभीर आजारांवर अशा प्रकारची प्रभावी लस किमान पाच वर्षांमध्येच विकसित केली जाईल.

वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूमरना लक्ष्य बनवणारी कर्करोगाची लसही लवकरच विकसित होईल. भविष्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूमरवर रुग्णांना लस मिळू शकेल. 'रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस' (आरएसव्ही) च्या विरुद्धही ही लस प्रभावी ठरेल. सध्या लस नसलेल्या अन्यही काही गंभीर आजारांसाठी लस उपलब्ध होईल. या लसी 'एमआरएनए' आधारित असतील जी पेशींना शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे प्रोटिन बनवण्यासाठी प्रेरित करतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news