Uttarakhand Tunnel Rescue : 41 मजूर ठणठणीत, कुठल्याही क्षणी घरी पाठवणार

Uttarakhand Tunnel Rescue : 41 मजूर ठणठणीत, कुठल्याही क्षणी घरी पाठवणार
Published on
Updated on

ऋषीकेश; वृत्तसंस्था : उत्तर काशीच्या बोगद्यात 17 दिवस अडकल्यानंतर महत्प्रयासाने सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या सर्व 41 मजुरांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना आता पेशंट म्हणण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना लवकरच घरी पाठवले जाईल, असे 'एम्स'च्या प्रशासनाने म्हटले आहे.

डॉ. रविकांत यांनी पत्रकारांना सांगितले की, या सर्व मजुरांच्या बारीकसारीक चाचण्या घेण्यात आल्या. त्यात रक्तचाचणी, एक्स-रे, ईसीजी, कान व डोळ्यांच्या चाचण्या, फुफ्फुस व पोटाशी संबंधित चाचण्या यांचा समावेश होता. सर्व 41 जणांचे अहवाल हाती आले असून, त्यानुसार त्यांना आता पेशंट म्हणण्याची गरज राहिलेली नाही. याचाच अर्थ ते पूर्णपणे ठणठणीत बरे आहेत. त्यांना आता लवकरच घरी जाण्याची मुभा दिली जाईल. या सर्वांना काही काळ फार श्रम न करण्याचा सल्ला तेवढा देण्यात आला आहे; कारण सलग 17 दिवस बंदिस्त जागेत राहिल्याने बाहेरच्या वातावरणात रुळताना थोडा वेळ लागू शकतो.

बंदिस्त जागेत रंगले क्रिकेटचे सामने

'एनएचआयडीसीएल'चे कर्नल दीपक पाटील या अडकलेल्या मजुरांशी 17 दिवसांत सतत संपर्क ठेवून होते. त्यांनी सांगितले की, त्या मजुरांनी बोलताना सांगितले की, आत खूप कंटाळा येतो. खेळायला पत्ते पाठवता येतील का? त्यांना पाईपमार्गे एक क्रिकेट बॅट व बॉल पाठवला. आतमध्ये खूप मोठी जागा आणि प्रकाश असल्याने त्यांना क्रिकेट खेळणे शक्य होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news