ऑनर किलिंग! बहिणीचे शीर घेऊन गावभर फिरला

ऑनर किलिंग! बहिणीचे शीर घेऊन गावभर फिरला

बाराबंकी; वृत्तसंस्था : यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यात फतेहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिठवारा गावात शुक्रवारी भावाने बहिणीचे शीर कापले आणि ते हातात घेऊन तो गावभर फिरला. गावकर्‍यांकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस पोहोचले व आरोपी भावाला अटक केली.

बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून भावाने हा प्रकार केल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. आरोपीचे नाव रियाज आहे. रियाजची बहीण कपडे धुण्यासाठी घराबाहेर आलेली होती. ती पाणी भरू लागलीच होती आणि रियाजने मागून हल्ला करून तिची मान कापली. शीर हातात घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाला. पोलिसांनी वाटेतच रियाजला अटक केली. रियाजची बहीण गावातील प्रियकर चांद बाबू याच्यासोबत पळून गेली होती. 29 मे रोजी कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चांद बाबूला अटक केली होती. मुलीला कुटुंबाच्या ताब्यात दिले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news