अमेरिकेचा ‘डबल गेम’! : निज्‍जर हत्‍या प्रकरणी ‘गुप्‍त’ माहिती दिली कॅनडाला

खलिस्‍तानी दहशतदवादी हरदीपसिंग निज्जर. (संग्रहित छायाचित्र)
खलिस्‍तानी दहशतदवादी हरदीपसिंग निज्जर. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडामध्‍ये खलिस्‍तानी दहशदवादी हरदीपसिंग निज्जर याच्‍या हत्येची माहिती अमेरिकेनेच कॅनडाला दिल्‍याचे  वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.निज्‍जर हत्‍या प्रकरणी कोणतेही पुरावे न देता कॅनडाचे पंतप्रधान या हत्येशी भारताचा संबंध जोडला होता. आता या प्रकरणी अमेरिकेच्‍या कृत्‍याचा पर्दाफाश झ्राला आहे. तसेच अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाने दिलेल्‍या अहवालामुळेच भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कमालीचे वाढले आहेत.

बंदी घातलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा (केटीएफ) प्रमुख निज्जर याची 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे हत्या करण्यात आली होती. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. याप्रकरणी भारताने कॅनडाच्या तपासात सहकार्य करावे, असे आवाहन अमेरिकेने केले आहे.

अमेरिकेच्‍या गुप्‍तचर अहवालात काय आहे?

'न्यूयॉर्क टाइम्स'ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर, अमेरिकेच्‍या गुप्तचर संस्थांनी त्यांच्या कॅनेडियन समकक्षांना गुप्तचर माहिती पुरवली. या हत्येत भारताचा हात असल्याचा निष्कर्ष काढण्यात या गुप्तचर यंत्रणेने कॅनडाला मदत केली."

अमेरिकेच्‍या अहवालानुसार, "निज्जरच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्‍या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅनेडियन समकक्षांना सांगितले की, वॉशिंग्टनला या कटाबद्दल कोणतीही माहिती नव्‍हती. अमेरिकन अधिकाऱ्यांना कॅनडामध्‍ये असे काही होणार असल्‍याची माहिती असती तर त्यांनी ती निश्‍चित कॅनडाला दिली असती." कॅनडाच्या अधिकार्‍यांनी निज्जरला इशारा दिला होता, परंतु ते भारताचे लक्ष्य असल्याचे सांगितले नाही, असेही अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले असल्‍याचे .'न्यूयॉर्क टाइम्स'ने म्‍हटले आहे.

अमेरिकेच्‍या राजदूतांनाही स्वीकारले अर्धे सत्य

कॅनडातील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड कोहेन यांनी 'सी'टीव्ही न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "अमेरिका आणि कॅनडामध्‍ये असलेल्‍या करारानुसार ट्रूडो यांना कॅनेडियन नागरिक निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सच्या संभाव्य सहभागाबद्दल माहिती दिली होती. या प्रकरणी कॅनडा आणि अमेरिकेमध्ये बरेच संभाषण झाले होते."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news