पुढारी ऑनलाईन : G-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) दिल्लीत दाखल झाले आहेत. जो बायडेन यांचे पालम येथील विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. तसेच यांच्यासमवेत जो बायडेन यांच्या स्वागतासाठी एक चिमुकलीही होती आणि या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले. ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण?
जो बायडन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांसह अमेरिकेतील भारतातील राजदूत एरिक गार्सेटी हेही (Eric Garcetti) उपस्थित होते. ही चिमुकली एरिक गार्सेटी यांची मुलगी आहे. हीचे नाव माया (Maya Garcetti) आहे. माया गार्सेट्टीनेही भारतात आलेनंतर जो बायडेन यांचे स्वागत केले. तीला भेटून जो बायडेन खूप आनंदी झाले. आणि त्यांनी तिला मिठी मारली.
एरिक गार्सेट्टी हे यूएस दूतावासात अमेरिकेचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. एरिक गार्सेटी यांनी कोलंबिया विद्यापीठातून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. तसेच ते ऑक्सफर्ड विद्यापीठात रोड्स स्कॉलर होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
दरम्यान, त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्ही रिझर्व्हमध्ये अधिकारी म्हणूनही काम पाहीले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर लॉस एंजेलिसचे ते पहिले जुलै 2013 ते डिसेंबर 2022 पर्यंत महापौर होते.