US Open 2023: जोकोविचची ‘युएस ओपन’वर मोहर, अंतिम सामन्‍यात मेदवेदेव पराभूत

टेनिस विश्‍वातील 'विक्रम'वीर नोव्‍हाक जोकोविच याने रविवारी ऐतिहासिक २४ व्‍या ग्रँड स्‍लॅमला गवसणी घातली.
टेनिस विश्‍वातील 'विक्रम'वीर नोव्‍हाक जोकोविच याने रविवारी ऐतिहासिक २४ व्‍या ग्रँड स्‍लॅमला गवसणी घातली.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टेनिस विश्‍वातील सर्बियाचा टेनिसपटू, 'विक्रम'वीर नोव्‍हाक जोकोविच याने रविवारी इतिहास घडवला. अमेरिकन ओपन (US Open 2023)  ग्रँड स्लॅम स्‍पर्धेत डॅनिल मेदवेदवचा ६-३, ७-६ (७-५), ६-३ असा पराभव करत त्‍याने ऐतिहासिक २४ व्‍या ग्रँड स्‍लॅमला गवसणी घातली. विशेष म्‍हणजे, त्‍याने आजपर्यंत ३६ ग्रँड स्लॅम स्‍पर्धेत अंतिम फेरीत धडक मारण्‍याचाही पराक्रम केला आहे.तसेच यूएस ओपन विजेतेपद त्‍याने चौथ्‍यांदा पटकावत एकेरी विजेतेपदांच्‍या विक्रमाची बरोबरीही साधली आहे.

US Open 2023 : पहिल्‍या सेटमध्‍येच जोकोविचची झंझावाती सुरुवात

३६ वर्षीय सर्बियाचा टेनिसपटू जोकोविच याने दहाव्‍यांदा यूएस ओपन स्‍पर्धेतच्‍या अंतिम फेरीत धडक मारली होती. रशियन टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव याचे त्‍याच्‍यासमाोर आव्‍हान होते. मात्र सुरुवातीपासूनच जोकोविच याने सामन्‍यावरील आपली पकड मजबूत केली. त्‍याने पहिल्‍याच सेटमध्‍ये ३-0 अशी आघाडी घेतली. यानंतर त्‍याने मागे वळून पाहिले नाही. पहिला सेट ४८ मिनिटांमध्‍ये ६-३ असा आपल्‍या नावावर केला.

१ तास ४४ मिनिटांचा दुसरा सेट… ट्रायब्रेकरमध्‍ये 'विक्रम'वीराची बाजी

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस राखून 3-3 अशी बरोबरी साधली. २७ वर्षीय मेदवेदेवआपली सर्व्हिस कायम ठेवली. दुसरा एक तास आणि 44 मिनिटे चालला. यंदाच्‍या युएस ओपन स्‍पर्धेतील तो सर्वात दीर्घ काळ चालेला सेट ठरला. अखेर टायब्रेकरमध्‍ये जोकोविचने आपला अनुभव पणाला लावत ७-६ असा दुसरा सेट आपल्‍या नावावर केला.

तिसर्‍या सेटमध्‍ये मेदवेदेवचा कमबॅकचा प्रयत्‍न

मेदवेदेवने तिसऱ्या सेटमध्ये ३-१ अशी आघाडी घेतली. मेदवेदेवने शानदार कमबॅक केले. मात्र तो आपली आघाडी कायम ठेवू शकला नाही. जोकोविचने सलग सर्व्हिस ब्रेक करत अखेर जोकोविचने तिसरा सेट ६-३ जिंकत आपल्‍या कारकीर्दीतील २४ व्‍या ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरलं.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news