uravshi rautela
uravshi rautela

Urvashi Rautela Oops moment : अन्‌ उर्वशी रौतेलाचा गाऊन घसरत गेला (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन

कधी कधी सेलिबि—टींना कार्यक्रमांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणीही विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागतो. रॅम्पवरून कॅटवॉक करीत येणार्‍या मॉडेल असोत किंवा एखाद्या कार्यक्रमात परफॉर्मन्स करीत असलेल्या अभिनेत्री असोत, अनेकींवर असे प्रसंग गुदरले आहेत. आता उर्वशी रौतेला हिलाही अशाच एका 'उप्स मोमेंट'चा सामना करावा लागला. अलीकडेच तिने बुर्ज अल अरबच्या छतावर आपला कार्यक्रम सादर केला व हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा असल्याचे सांगितले.

हा कार्यक्रम सादर करणे तिच्यासाठी आव्हानात्मक होते. बॉडीफिट गाऊनमध्ये ती 'कम्फर्टेबल' नव्हती. कार्यक्रम सादर करीत असताना तिचा हा गाऊन वारंवार घसरत होता. मात्र, 'उप्स मोमेंट'ची शिकार होण्यापासून तिने स्वतःचा बचाव केला. 'बुर्ज अल अरब'च्या टॉपवर कार्यक्रम करणारी ती पहिलीच भारतीय तारका आहे. तिने यावेळी 50 हजारांपेक्षाही अधिक लोकांसमोर कार्यक्रम सादर केला आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून दादही दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news