पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया स्टार, मॉडेल उर्फी जावेदचा (Urfi Javed ) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिला जीवे मारण्याची धमकी मिळालीय. अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी आता जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. ही धमकी तिला तिच्या एका आऊटफिटमुळे मिळालीय. तिने हेलोवीनसाठी डिझाईन केलं होतं. (Urfi Javed )
काही दिवस आधी उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने बॉलिवूड चित्रपट 'भूल भुलैया' मधील राजपाल यादवसारखा 'छोटा पंडित' चा गेटअप केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करताच व्हायरल होऊ लागला. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने उर्फी जावेदला ईमेल करून धमकी दिली आणि म्हटलं की, व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली आणि म्हटले की, जर तिने असे केले नाही तर तिला जीवे मारण्यात येईल.
धमकीनंतर उर्फीने मुंबई पोलिसात तक्रार दिलीय. एक्स (ट्विटर) वर पोस्टदेखील करून माहिती दिली. उर्फीला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून ईमेल मिळाला आहे. पहिला ईमेल तिला कुणा निखिल गोस्वामी नावाच्या ईमेल ID वरून मिळाला होता. 'जो व्हिडिओ तू अपलोड केला आहेस, तो डिलीट कर नाही तर जीवे मारायला वेळ नाही लागणार.' यानंतर दुसरा ईमेल आला, जो रुपेश कुमार नावाच्या व्यक्तीकडून मिळालाय. या मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं- 'आमच्या हिंदू धर्माला बदनाम करत आहे उर्फी जावेद, तुझं आयुष्य जगून घे. चौकामध्ये तुला गोळी मारेन.'
इन्स्टाग्रामवर उर्फीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने भुलभुलैयातील 'छोटा पंडित' सारखा गेटअप केला होता. तिने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, 'पानी! मला आशा आहे की, प्रत्येकाला माहिती असते की, छोटा पंडित भूलभुलैयाचे एक पात्र आहे. खूप उत्तमपणे हेलोवीन पार्टीसाठी तयार झाले होते. पण जाऊ शकले नाही. त्यामुळे विचार केला की, व्हिडिओ पोस्ट करेन.'