Urfi Javed : मला लग्नाआधी प्रेग्नेंट…उर्फीचा रिलेशनशीपविषयी मोठा खुलासा

urfi javed
urfi javed

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल उर्फी जावेद फॅशनच्या बाबतीत किती हटके आहे, हे सर्वश्रुत आहे. (Urfi Javed) आता तिचे लग्नाबाबतचे विचारही हटकेच असल्याचे दिसून आहे. ती लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल बोलताना म्हणाली की, मला लग्नाआधी प्रेग्नेंट व्हायचे आहे. मग बेबी बंप घेऊन लग्न करायचे आहे. मला माझ्या आयुष्यात इतरांपेक्षा अगदी वेगळा पार्टनर हवाय. (Urfi Javed)

हे ऐकल्यानंतर सर्वच जण थक्क राहिले. उर्फी जावेद आपल्या रिलेशनशीप आणि लग्नाबद्दल बोलताना दिसली. ती लग्न करायला तयार आहे. पण मुलासाठी तिने एक मोठी अट घातली, जी ऐकून सर्व जण हैराण झाले आहेत.

उर्फी जावेदचा फॅशन सेन्स अगदीच वेगळा आहे. तिने केलेल्या एका फोटोशूटमध्ये उर्फीने सेमी न्यूड फॅशन केले होते. तिने शर्ट घातले नव्हते. या फोटोशूटमध्ये तिच्या शरीरावर फक्त नाश्त्याच्या प्लेट असल्याचे दिसले. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून अनेकांचे डोळे विस्फारले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news