UPSC 2022 : ‘युपीएससी’ परीक्षेत मुलींची बाजी

upsc exam result
upsc exam result

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC 2022) नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल आज (दि. २३) जाहीर केला. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. या वर्षीदेखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्‍या चार स्‍थानांवर मुलींनी आपल्‍या नावाची माेहर उमटवली आहे.   इशिता किशोरने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर गरिमा लोहिया, उमा हराथी, स्मृती मिश्रा यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चाैथा क्रमांक पटकावला आहे.

UPSC 2022 CSE पूर्व परीक्षा 5 जून 2022 रोजी झाली होती. या परीक्षेचा निकाल 22 जून २०२२ रोजी जाहीर झाला. तर मुख्य परीक्षा 16 ते 25 सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात आली. मुख्‍य परीक्षेचा निकाल 6 डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झाला. तर 18 मे २०२३ रोजी मुलाखती झाल्या होत्या.

इशिता ही नवी दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. येथून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. इशिता किशोर हिने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा पर्यायी विषय निवडला होता. ती सुरुवातीपासूनच खेळाशी निगडीत आहे. इशिता शाळेतही हुशार होती. इशिता ग्रॅज्युएशननंतर एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. नोकरीसोबतच त्यांनी यूपीएससीची तयारी केली आहे.

दरम्यान, मागील वर्षी श्रुती शर्माने UPSC CSE 2021 च्या अंतिम निकालात ऑल इंडिया रँक 1 मिळवला होता. अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर चंदीगड येथील गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला होता.

UPSC 2022 : परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले दहा विद्यार्थी

इशिता किशोर

गरिमा लोहिया

उमा हरति एन

स्मृति मिश्रा

मयूर हजारिका

गहना नव्या जेम्स

वसीम अहमद भट

अनिरूद्ध यादव

कनिका गोयल

राहुल श्रीवास्तव

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news