नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल (UPSC Result) जाहीर केला आहे. या परीक्षेत श्रुती शर्मा, अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे देशात अव्वल तीन क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
UPSC च्या आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. या वर्षी पहिल्या तीन क्रमांकावर मुलीच अव्वल ठरल्या आहेत. श्रुती ही सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. तिने जामिया मिलिया इस्लामिया कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती आणि निकाल १७ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या. २६ मे पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या.
UPSC Result निकाल पाहण्यासाठी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.