पुढारी ऑनलाइन डेस्क : UPI System : 'UPI' ने या वर्षीच्या मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक व्यवहार केले आहेत. ताज्या डेटानुसार 9 अब्जाहून अधिक UPI व्यवहार झाल्याची नोंद आहे. ज्याची किंमत 14 लाख कोटींहून अधिक आहे. मे महिन्यात मासिक UPI व्यवहारांची संख्या वार्षिक आधारावर 58 टक्क्यांहून अधिक वाढली आहे, ज्यामुळे ते आतापर्यंतचे सर्वोच्च प्रमाण आणि मूल्य आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीतील मासिक व्यवहार मूल्य 43 टक्क्यांनी वाढले आहे.
भारताने 2016 मध्ये पैशांच्या देवाण घेवाण व्यवहारासाठी UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही प्रणाली लाँच केली. तेव्हापासून पैशांचे व्यवहार डिजिटल स्वरुपात करणे सोपे झाले. UPI पेमेंट प्रणाली ही जागतिक स्तरावर स्वीकृत प्रणालींपैकी एक आहे. गेल्या सहा वर्षात UPI ही एक विश्वासार्ह पेमेंट मोड म्हणून उदयास आली आहे.
डेटा हे देखील दर्शविते की भारताच्या स्वदेशी पेमेंट सिस्टमने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 83 अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे. ज्याची रक्कम ₹ 139 लाख कोटी आहे. आर्थिक वर्ष 2022 मधील 38 अब्ज व्यवहारांमधून हे ₹ 84 लाख कोटी इतके वाढले आहे.
सरकारने 10 देशातील अनिवासी भारतीयांना UPI प्रणाली व्यवहारासाठी उपलब्ध करून दिली आहे. ते त्यांच्या भारतीय फोन नंबरवर अवलंबून न राहता व्यवहरांसाठी UPI सेवेचा उपयोग करू शकतात. सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि यूके हे देश आहेत.
सरकारने भारतातील अभ्यागतांना UPI वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. G20 देशातील अभ्यागतांना सुरुवात करण्यासाठी UPI पेमेंट करण्याची परवानगी आहे. मात्र, ती विशिष्ट विमानतळांवर देण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत भारताकडे G-20 चे अध्यक्षपद असल्याने, देशातील अनेक कार्यक्रमांना परदेशी प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
हे ही वाचा :