महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला येत आहे “कस्तुरी”

kasturi tv serial
kasturi tv serial
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक असं नातं ज्याचे शब्दांत वर्णन करणे कठीणच! एक असं नातं जे प्रत्येकाला हवंहवं वाटतं… ज्यात आईच्या प्रेमाची ऊब आहे, वेळ पडल्यास जगाशी लढायचे सामर्थ्य आणि जी संकटात खूप मोठा आधार तर नाही म्हणतं प्रत्येक चुक पोटात घालणारी आहे. या नात्याची व्याख्या करताच येणार नाही. सगळ्या नात्यांपलीकडचं असं नातं. आपण अगदी पूर्वीपासून या नात्याची अनोखी उदाहरणे ऐकत आलो आहे. असं म्हणतात आईनंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. हे अनोखं नातं म्हणजे बहिण – भावाचं. कस्तुरी आणि नीलेशचं नातं देखील असंच आहे अगदी घट्ट. पण, बहिणीची वेडी माया कधी भावाला कळली आहे का? तिच्या पोटी लपलेली भावा विषयीची काळजी त्याला कधी कळेल ? आपल्या भावासाठी प्रत्येक सुखाचा त्याग करणारी, आलेल्या अडचणींना ठामपणे सामोरी जाणारी, प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्यासोबत असणारी कस्तुरी अचानक आपल्या भावाशी अबोला का धरते? त्यांच्या नात्यात दुरावा का येतो ? असं काय घडतं या दोघांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते? नात्यांना जोडणारी, घट्ट धरून ठेवणारी कस्तुरी असा टोकाचा निर्णय का घेते ? जाणून घेण्यासाठी बघा हॅपी डिजिटल निर्मित "कस्तुरी" २६ जूनपासून सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. एकता लब्दे कस्तुरीची भूमिका साकारणार असून समर कुबेरची भूमिका अशोक फळदेसाई तर निलेशची भूमिका दुष्यंत वाघ साकारणार आहे.

अत्यंत दिलदार स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असणारी कस्तुरी. जिचा 'करुणा' हा स्थायी भाव आहे. कस्तुरी मातीत रुजलेली असली तरी तिला नाविन्याची आवड आहे. कस्तुरी तुकोबांच्या विचाराने वागते, "खटाशी असावे खटनट, उद्धटाशी उद्धट".

निलेश कस्तुरीचा धाकटा भाऊ. अत्यंत हुशार पण संतापी आहे. निलेश समर कुबेर याच्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. समर अत्यंत महत्वाकांक्षी. काहीसा स्वार्थी, पण काहीतरी चांगलं करून दाखवण्याची इच्छा असलेला कुबेर घराण्याचा मुलगा आहे. पण निलेशला कस्तुरीचा विरोध आहे. बहिण भावाच्या नात्यात प्रेम आहे, मान आहे, बहिण करत असलेल्या मेहनतीची जाणीव आहे. पण, तिचा विरोध असल्याने त्यांच्यात खटके उडत आहेत. समरच्या आयुष्यात येण्याने अशी कुठली घटना घडणार, ज्यामुळे तिघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार? समरच्या मनात दडलेलं असं कुठलं सत्य आहे, ज्यापसून कस्तुरी अनभिज्ञ आहे. हे आपल्याला हळूहळू कळेलच.

झाडाला ताठ उभ ठेवणाऱ्या मुळासारखी घट्ट आधार देते ती बहीण. कस्तुरी आईच्या हृदयानी भावाला जपते. सुख, दुःखात पाठीशी उभी रहाते. खूप माया तर करतेच, पण भावाला घडवते. आपली सुखं देऊन भावाची दुःख वेचते. कारण बहिणीच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा भाग असतो भाऊ. ती भावासाठी स्वतः उन्हात राहून सावली देणारं मायेचा कल्पवृक्ष बनली. कशी असेल या भाऊ बहिणींची गोष्ट? समर कुबेरच्या येण्याने यांच्या नात्याला कुठलं वळण मिळेल? समर – कस्तुरीच्या नशिबात नियतीने काय लिहून ठेवले आहे?
जाणून घेण्यासाठी बघा "कस्तुरी" २६ जून पासून सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. याच दिवसापासून "सुंदरा मनामध्ये भरली" मालिका नक्की बघा रात्री ११.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news