UP Prayagraj Accident : तवेराची वीजेच्या खांबाला धडक, लहान मुलासह 5 ठार

UP Prayagraj Accidnt
UP Prayagraj Accidnt

पुढारी ऑनलाइन डेस्क : UP Prayagraj Accident : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे हंडिया टोल प्लाजाजवळ भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहे. एक तवेरा कारचे नियंत्रण सुटल्याने ती अनियंत्रित होऊन हंडिया टोल प्लाझा जवळील वीजेच्या खांबावर जोरदार आदळली. घटनेत एका लहान मुलासह 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, UP Prayagraj Accident : तवेरा गाडी कानपूरवरून वाराणसीला निघाली होती. यावेळी प्रयागराज येथील हंडिया टोल प्लाजा येथे आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कारने जवळच्या वीजेच्या खांबाला जोरधार धडक दिली. या घटनेत एका बालकासह चार महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य 5 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

UP Prayagraj Accident : दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृतांचे शव पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तर जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news