Breaking News : भोपाळमध्ये गॅस गळतीमुळे खळबळ, एका महिलेसह तिघे रुग्णालयात दाखल | पुढारी

Breaking News : भोपाळमध्ये गॅस गळतीमुळे खळबळ, एका महिलेसह तिघे रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Breaking News : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गॅस गळतीमुळे लोकांमध्ये खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोपळच्या मदर इंडिया कॉलनीमध्ये बुधवारी रात्री क्लोरीन गॅस टँकमधून गॅस गळती झाली. यामुळे शेजारच्या वस्तीत राहणा-या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेत एका महिलेसह तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रशासनाने स्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

Breaking News : जिल्हाधिकारी अविनाश लवनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदगाह वॉटर प्लांट येथे पाणी स्वच्छ करण्याचे काम सुरू असताना चुकून क्लोरिन गॅस सिलिंडरमध्ये गळती झाली. परिस्थिवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, तसेच ही दुर्घटना खूप मोठी नाही. मदर इंडिया कॉलनीजवळ क्लोरीन गॅस प्लांट आहे. तेथील ईदगाह वॉटर फिल्टर प्लांटमध्ये पाणी स्वच्छ करण्याचे काम करण्यात येत होते. मात्र त्यावेळी सिलिंडरमध्ये क्लोरीन गॅसच्या माध्यमातून ही गॅस गळती झाली. या गॅस गळतीमुळे तेथिल स्थानिक लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Breaking News : प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेमुळे काही नागरिकांना डोळ्यात जळजळ होणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास झाले आहेत. तर कॉलनीतील तीन लोकांना हमीदिया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Breaking News : क्लोरीन वायूच्या सुरक्षिततेची आणि नियंत्रणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी, डीसीपी, कॉर्पोरेशन आयुक्तांद्वारे प्लांट आणि त्याच्या लगतच्या गृहसंकुल, मदर इंडिया कॉलनी, इदगाह हिल्स मल्टी सबी यांची पाहणी करून सुनिश्चित केली जात आहे. जल प्राधिकरण, महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची टीम एकत्रितपणे काम करत आहे. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत सर्व विभागांचे कर्तव्य बजावण्याचेही सुनिश्चित करण्यात आले आहे.

Breaking News : दरम्यान, गॅस गळती म्हटले की भोपाळ वासियांना 90 च्या दशकातील भयानक भोपाळ गॅस दुर्घटनेची आठवण येते. जी एक भयानक दुर्घटना होती. ज्यामध्ये अनेकांच्या पिढ्यांना वेगवेगळे आजार झाले. त्यामुळे आता लहानशा गॅस दुर्घटनेमुळे देखिल परिसरात मोठी खळबळ आणि भीती निर्माण होत असते.

हे ही वाचा :

Congress : खर्गेंनी केली काँग्रेसमध्ये कार्यकारिणी ऐवजी सुकाणू समितीची स्थापना

अहमदनगर : पिंपळगाव येथे दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघातात दोन तरुण ठार

Back to top button