UP Opinion Poll : ‘सपा’ भाजपला चांगलीच टक्कर देणार; वाचा ओपिनियन पोल

UP Opinion Poll : ‘सपा’ भाजपला चांगलीच टक्कर देणार; वाचा ओपिनियन पोल

लखनऊ, पुढारी ऑनलाईन : सध्या देशभर उत्तर प्रदेशमधील निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे. प्रत्येक जण आपापले अंदाज (UP Opinion Poll) लावत योगी की, अखिलेश यांच्यावरच चर्चा झाडत आहेत. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे यूपीतील सर्वच पक्ष व्हॅर्च्युअल रॅलीतून ४०३ उमेदवारांची यादी बनविण्याचं काम सुरू आहे. तर यूपीच्या जनतेचा कल जाणून घेण्यासाठी निवडणुकीचा पोल घेतला जात आहे. यावर इंडिया टीव्हीनं ओपिनियन पोल घेतला आहे. त्यामध्ये भाजपला २३०-२३५ जागा मिळू शकतील आणि पुन्हा सत्तेची माळ भाजपच्या गळ्यात पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. (UP Opinion Poll)

UP Opinion Poll : 'सपा'ची जोरदार टक्कर; १६०-१६५ जागा मिळण्याची शक्यता

या पोलमध्ये असं दिसून येत आहे की, एकमेव समाजवादी पक्ष हा भाजपला टक्कर देत आहे. या ओपिनियन पोलमध्ये (UP Election Poll) भाजपला राज्यातून ४०३ जागांपैकी २३०-२३५ जागा मिळू शकतील, तर समाजवादी पक्षाला १६०-१६५ जागा मिळतील, अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यामध्ये काॅंग्रेसला ३-७ जागा मिळतील आणि बसपाला अवघ्या २-५ जागा मिळतील, असंही अंदाज वर्तविला आहे.

पूर्वांचलमध्ये भाजपला बसणार फटका 

या पोलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, पूर्वांचलमध्ये भाजप आणि सपा यांच्या काटे की टक्कर होताना दिसते आहे. पूर्वांचलमधील १२४ जागांपैकी ६६ जागा भाजपला मिळतील, तर सपाला ५१ मिळू शकतील, बसपाला २ आणि काॅंग्रेसला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

२०१७ च्या निवडणुकीमध्ये पूर्वांचल येथे भाजपला ९४ जागा, सपाला फक्त १४ मिळाल्या होत्या. तर बसपाला १० जागा आणि काॅंग्रेसनं फक्त २ जागा मिळविल्या होत्या.

गोरखपूरमध्ये योगींना मिळणार मोठा विजय

गोरखपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तिथं योगी आदित्यनाथ यांना मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. कारण, योगी १९९८ पासून सलग खासदार म्हणून निवडून आलेले आहे.  २०१७ मध्ये त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर योगींना खासदारकी सोडली.

सध्या निवडणुकीपूर्वीच सपाने भाजपला धक्क्यांवर धक्के देण्यास सुरू केले आहे. कारण, भाजपचे आमदार आणि योगींच्या मंत्रीमंडळातील मंत्री भाजपला राम राम ठोकून सपामध्ये सामील झाले आहेत.

त्यामुळे सपा आणि भाजपा यांच्या जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news