राज्यात अवकाळी पावसाचा आठवडाभर जोर कायम; 4 दिवस गडगडाटीसह अवकाळी

राज्यात अवकाळी पावसाचा आठवडाभर जोर कायम; 4 दिवस गडगडाटीसह अवकाळी

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचा आठवडाभर विदर्भात जोर कायम राहणार आहे. पुढील 4 दिवस राज्यात गडगडाटीसह अवकाळी पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील तसेच खानदेशातील अकराणी शहादा, शिरपूर, चोपडा, यावल रावेर, एदलाबाद परिसरात अवकाळी पाऊस बसणार आहे.

उर्वरित खान्देश, नाशिक, नगर, पुणे ,सातारा जिल्ह्यांत 1 मे पर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल. मुंबईसह कोकणात मात्र आज व उद्या तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात संपूर्ण आठवडाभर म्हणजे 4 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

विदर्भात संपूर्ण आठवडा म्हणजे 4 मे पर्यंत अवकाळी वातावरणासहित पावसाची तीव्रता अधिक असेल. पुढील तीन दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत अवकाळी वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल. विदर्भात जोरदार पावसासहित सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस

महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू 2 डिग्रीने सरासरीपेक्षा घसरणार आहे. त्यामुळे आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येईल. तर पुढील 5 दिवसांत कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news