पुण्यातील वकिलाचा प्रताप ! अनैसर्गिक संबंधांनंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे

crime
crime

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका वकिलाने तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. वकिलाने तरुणासोबतच्या अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याबरोबरच कुटुंबियांना जीवे ठार करण्याची धमकी देऊन 6 लाख 70 हजार रुपये जबरदस्तीने उकळून अपहार केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २७ वर्षीय वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणाची दोघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर, आरोपीने तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि कुटुंबियांना ठार करण्याची धमकी देऊन, सात लाख रुपयांची मागणी केली. मात्र फिर्यादी तरुणाने पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने तरुणाच्या आईला तुमच्या मुलाला माग्रेशनचा आजार असल्याचे खोटे सांगून त्याचे आणि तरुणाच्या पत्नीचे 20 तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर ते दागिने पिंपरी येथील एका फायनान्स कंपनीकडे गोल्ड लोन साठी ठेवून 6 लाख 70 हजार रुपये जबरदस्तीने फिर्यादीकडून काढून घेऊन पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच तरुणाची महत्वाची कागदपत्रे देखील आरोपीने धमकावून काढून घेतली आहेत. हा प्रकार घडल्यानंतर तरुण आणि पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news