अवघ्या पाच हजाराच्या उधारीसाठी मित्रानेच केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार

अवघ्या पाच हजाराच्या उधारीसाठी मित्रानेच केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुलुंडमध्ये एका मित्रानेच उधार दिलेले पैसे परत न केल्याने झालेल्या वादातून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी सुरेश आत्माराम म्हस्के(वय ३४) याला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुलुंडच्या मुलुंड कॉलनी परिसरात पीडित ३३ वर्षीय तरुण रहातो. तिथेच सुरेश हा देखील रहातो. हे दोघे ही पालिकेत कंत्राटी कामगार आहेत. पीडित तरुणाने सुरेश कडून पाच हजार रुपये घेतले होते. हे पैसे परत देण्यास पीडित तरुण टाळा टाळ करीत होता. यामुळे संतापलेल्या सुरेश ने दि ६ जुलै रोजी पीडित तरुणाला मुलुंड कॉलनी येथील हिंदुस्तान चौक समोरील गोडाऊनमध्ये गाठले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. एवढेच नाही तर त्याच्या गुद्दद्वारात लोखंडी पाईप घातला आणि त्याला मेणबत्तीने चटके देत त्याच्यावर क्रूर अत्याचार केले. यामुळे पीडित तरुण गंभीर जखमी झाला. त्याला सायन येथील पालिकेच्या टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून उपचार सुरू केले. तसेच सदर पीडित तरुणावरील झालेल्या अत्याचाराची माहिती मुलुंड पोलिसांना दिली.

या प्रकरणी सोमवारी (दि. ११ जुलै) मुलुंड पोलिसांनी आरोपी सुरेशला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अवघ्या पाच हजार रुपयांसाठी एका मित्रानेच दुसऱ्या मित्रावर अशा प्रकारे अनैसर्गिक अत्याचार केल्याने या विभागात खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news