तुम्‍हाला मृत्‍यूचा खेळ मान्य आहे का?: स्‍मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

Smriti Irani
Smriti Irani

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्‍या होताना दिसत आहे, लोकशाही हक्क मागणार्‍या लोकांची हत्या केली जात आहे. हे सारे काही तृणमूलमुळेच होत आहे. काँग्रेस पक्षाने तृणलूल काँग्रेसशी हातमिळवणी आहे. हा मृत्यूचा खेळ राहुल गांधींना मान्य आहे का?, असा सवाल करत केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी यांनी हल्‍लाबोल केला. काँग्रेस पक्षाने तृणमूलशी आघाडी केल्याबद्दल त्‍यांनी गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला.

मध्‍य प्रदेशची राजधानी भोपाळमध्‍ये माध्‍यमांशी बोलताना स्‍मृती इराणी म्‍हणाल्‍या की, पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत लोकशाहीची हत्या होताना लोक पाहत आहेत. या राज्‍यात लोकशाहीचा हक्‍कासाठी लढा देणार्‍यांची हत्या केली जात आहे. तर दुसरीकडे गांधी कुटुंब तृणमूलशी हातमिळवणी करत आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराला खतपाणी घालणार्‍यांशी हातमिळवणी करणे गांधी परिवाराला मान्य आहे का? हा मृत्यूचा खेळ राहुल गांधींना मान्य आहे का?, असे सवालही त्‍यांनी यावेळी उपस्‍थित केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news