केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गुरुवारी (दि. 2) रात्री 11.05 वाजता कोल्हापुरात आगमन झाले. मंत्री शहा यांनी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. भाजपचे नेते व पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. त्यांना कानमंत्र देऊन सूचना केल्या. दरम्यान, अमित शहा मुक्काम करत असलेल्या हॉटेल व परिसराचा पोलिसांनी ताबा घेतला. अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गृहमंत्री शहा हेलिकॉप्टरने रात्री उजळाईवाडी विमानतळ येथे आले. तेथून ते वाहनांतून पंचशील हॉटेलमध्ये आले. खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, माजी आमदार अमल महाडिक, समित कदम, समरजित घाटगे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे आदींनी शहा यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.

मंत्री शहा हे शुक्रवारी (दि. 3) दुपारी 12 वाजता कोल्हापुरातून हेलिकॉप्टरद्वारे कर्नाटकमधील हुक्केरी येथे सभेसाठी जाणार आहेत. हुक्केरी येथून दुपारी 2.30 वा. रत्नागिरीला जाणार आहेत. तेथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरीतून दुपारी 4.30 वा. ते विटा, सांगली येथील सभेसाठी निघणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6 वा. कोल्हापूर विमानतळ येथे पुन्हा त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते गोव्याला रवाना होणार आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमदेवार खा. संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खा. धैर्यशील माने उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीतील नेतेमंडळींच्या कोल्हापुरात सभा झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 एप्रिल रोजी कोल्हापुरात जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत सभा घेतल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा कोल्हापुरात आले आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news