Union Cabinet Metting: भारत बनणार सेमीकंडक्टर निर्मितीचे हब; केंद्राची ३ प्रकल्पांना मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Union Cabinet Metting: भारत बनणार सेमीकंडक्टर निर्मितीचे हब; केंद्राची ३ प्रकल्पांना मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज (दि.२९) सेमीकंडक्टर निर्मितीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तीन नवीन सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये जवळपास १.२६ लाख कोटीची गुंतवणुक करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या तीन प्रकल्पांपैकी गुजरातमध्ये दोन आणि आसाममध्ये एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांचा समावेश आहे. (Union Cabinet Metting)

या संदर्भात माध्यमांना दिलेल्या माहितीत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले आहे की, आज गुरूवार दि.२९ रोजी झालेल्या केंद्रीय बैठकीत टाटा कंपनीच्या सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला जवळपास ५० हजार करोड रूपयांची मंजूरी देण्यात आली आहे. दरम्यान, भारताला मोठे सेमीकंडक्टर हब बनवायचे आहे, असे देखील मंत्री अश्विन यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Union Cabinet Metting)

भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठीचा कार्यक्रम डिसेंबर 2021 मध्ये एकूण रु. 76,000 कोटी खर्चासह अधिसूचित करण्यात आला. 'भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम्सचा विकास' अंतर्गत भारतातील या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांसंदर्भातील निर्णय आज (दि.२९) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (Union Cabinet Metting)

ईशान्येला आसाममध्ये पहिले सेमीकंडक्टर युनिट

या सुविधेद्वारे वार्षिक 300 कोटी चिप्स तयार केल्या जातील. ईशान्येला आसाममध्ये पहिले सेमीकंडक्टर युनिट मिळेल. दररोज 48 दशलक्ष चिप्स तयार केल्या जातील. येथून, ब्रेकडाउन म्हणजे FAB मधील गुंतवणूक 91,000 कोटी असेल तर आसाम युनिटमध्ये 27,000 कोटी गुंतवणूक होईल. साणंद युनिटमध्ये 7,600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल," असेही मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील प्रकल्पासाठी 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

Tata Electronics Private Limited ("TEPL") पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्प (PSMC), तैवान सोबत भागीदारीत एक fab">सेमीकंडक्टर फॅब स्थापित करेल. "हा फॅब गुजरातच्या ढोलेरा येथे बांधला जाईल. या फॅबमध्ये 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. PSMC तर्कशास्त्र आणि मेमरी फाउंड्री विभागातील कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. PSMC कडे तैवानमध्ये 6 सेमीकंडक्टर फाउंड्री आहेत. क्षमता 50,000 वेफर प्रति महिना सुरू होते. (WSPM), "रिलीझमध्ये म्हटले आहे. जून 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याच्या मायक्रोनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज

एक कोटी कुटुंबांना रूफटॉप सोलर बसवण्यासाठी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला आज गुरूवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेवर ७५,०२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. "आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात 'पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने'ला आज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे…" अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news