पुढारी ऑनलाईन: 5G प्रणाली सेवा वापरून अॅप्स विकसित करण्यासाठी अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100 प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. नवीन संधी, व्यवसाय मॉडेल आणि रोजगाराची क्षमता लक्षात घेता या लॅबची उभारणी कऱण्यात येणार आहे. या अॅप्समध्ये स्मार्ट क्लासरूम्स, प्रिसिजन फार्मिंग, इंटेलिजेंट आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम्सचा समावेश असणार आहे.
5G प्रणालीमुळे देशात नव्या आर्थिक संधी निर्माण होणार असून विकासामध्ये असलेले पारंपारिक अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील 5G च्या नवक्रांती आणि अंमलबजावणीसाठी 100 लॅब उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली.
डिजिटल तंत्रज्ञानाची लाट स्मार्टफोनचा वाढता वापर आणि तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार यामुळे पारंपरिक तसेच नव्या क्षेत्रामध्ये संधीची धार उघडली जातील. नव्या आर्थिक संधी निर्माण होत आहेत. नऊ उद्योजक आणि मोठ्या उद्योगांना मोठा वाटा सापडल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले होते, नव्या युगाची दूरसंचार प्रणाली असलेल्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग वाढणार आहे. याचा वापरकर्त्या ग्राहकांना विशेषत: शिक्षण, आरोग्य, कामगार सुरक्षा, अत्याधुनिक शेती या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा आधारे घेऊन सुरू होणाऱ्या नवोद्यमींना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. असेही त्यांनी आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट केले होते.
आपली खरी ताकद दाखवण्यासाठी अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते. अत्याधुनिक दूरसंचार प्रणाली देशाच्या ग्रामीण भागात शहराच्या मागे पडला असतानाच खेड्यामध्ये होत असलेली वाढ उत्साहवर्धक आहे.