आरोग्य मंत्रालयातील अवर सचिव सीबीआयच्या अटकेत

आरोग्य मंत्रालयातील अवर सचिव सीबीआयच्या अटकेत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास संस्था, सीबीआयने केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अवर सचिवाला अटक केली आहे. एक आवश्यक वक्तव्य जारी करण्यासाठी अमेरिकेतील रहिवासी असलेल्या एका भारतीयाकडून लाच मागितल्याच्या आरोपखाली सीबीआयाने या अधिकाऱ्याला अटक केली आहे. सोनू कुमार असे आरोपीचे नाव असून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात येत असल्याचे कळतेय.

शुक्रवारी सीबीआयाने यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. आरोपीला राऊज एव्हेनू न्यायालयात हजर केले जाईल. आरोपी सोनू कुमार यांनी 'स्टेटमेंट ऑफ नीड' जारी करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. सापळा रचून सीबीआयाने आरोपी अधिकाऱ्याला अटक केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news