Under 19 World Cup : पाकिस्तानचा खेळ खल्लास!

Under 19 World Cup : पाकिस्तानचा खेळ खल्लास!
Published on
Updated on

बेनॉई, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील 19 वर्षांखालील वर्ल्डकपचा (Under 19 World Cup) सेमीफायनल सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने 16 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 179 धावांत रोखले होते. मात्र, हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 164 धावा अशी झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून हॅरी डिक्सनने 50 तर ओली पीकने 49 धावा केल्या. राफ मॅकमिलनने नाबाद 19 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 11 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

अंडर-19 वर्ल्डकपच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम स्ट्रेकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानची अवस्था 7 बाद 79 धावा अशी केली होती. मात्र, अझान आणि अराफत यांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानने 150 धावांचा टप्पा पार केला. मात्र 24 धावांत 6 विकेटस् घेणार्‍या स्ट्रेकरने अखेर पाकिस्तानचा डाव 179 धावांवर संपवला.

ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचे 180 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला होता. हॅरी डिक्सन आणि सॅम कोनस्टासने 33 धावांची सलामी देत चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचे गोलंदाज अली रझा, अराफत मिन्हास यांनी चांगला मारा करत ऑस्ट्रेलियाची अवस्था बघता बघता निम्मा संघ गारद केला. हॅरी डिक्सन देखील 52 धावा करून बाद झाला होता.

ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 102 धावा अशी झाली असताना ओली पीक आणि टॉम कॅम्पबेल यांनी सहाव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 164 धावा अशी झाली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 34 धावांची गरज होती. त्यावेळी त्यांच्या हातात पाच विकेटस् होत्या. मात्र पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेटस् फक्त 18 धावांत घेतल्या. त्यांची अवस्था 5 बाद 146 वरून 9 बाद 164 अशी केली होती. मात्र राफ मॅकमिलनने शेवटपर्यंत लढा देत 19 धावा केल्या अन् शेवटच्या षटकात कांगारूंना विजय मिळवत फायनल गाठून दिली.

संक्षिप्त धावफलक – (Under 19 World Cup)

पाकिस्तान : 48.5 षटकांत सर्वबाद 179 धावा. (अझान आवेझ 52, अराफत मिन्हास 52. टॉम स्ट्रेकर 6/24.)
ऑस्ट्रेलिया : 49.1 षटकांत 9 बाद 181 धावा. (हॅरी डिक्सन 50, ऑलिव्हर पीक 49. अली रझा 4/34)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news