तापमान वाढ रोखण्यासाठी पृथ्वीच्या डोक्यावर ‘छत्री’!

तापमान वाढ रोखण्यासाठी पृथ्वीच्या डोक्यावर ‘छत्री’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगासमोर सध्या 'जागतिक तापमानवाढ' ही गंभीर समस्या आहे. दरवर्षी पृथ्वीच्या तापमानात वाढच होत आहे. जगभरातील संशोधक यावर उपायही शोधत आहेत. आता काही वैज्ञानिकांनी ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी पृथ्वीच्या डोक्यावर 'छत्री' धरण्याची संकल्पना मांडली आहे. उन्हात फिरत असताना अनेक लोक डोक्यावर छत्री धरून सूर्याच्या उष्णतेपासून बचाव करत असतात. त्याचप्रमाणे जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी अंतराळात 'सनशेड' तयार केली जाईल.

या 'सनशेड'बाबत अध्ययन व प्रचार करण्यासाठी एका समूहाची स्थापना करण्यात आली आहे. प्लॅनेटरी सनशेड फाऊंडेशन अनेक वर्षांपासून असे पेपर तयार करीत आले आहे जे या संकल्पनेचे समर्थन करते. फाऊंडेशनचे म्हणणे आहे की सौर विकिरणांना 'मॅनेज' करणे हा जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर चांगला उपाय ठरू शकतो. हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी तीन मार्ग आहे. त्यापैकी पहिला कार्बन उत्सर्जन कमी करणे, दुसरा कार्बन डायऑक्साईड हटवणे आणि तिसरा सौर विकिरणाला नियंत्रित करणे.

जगातील सरासरी तापमानाला सध्याच्या सरासरी तापमानापेक्षा 1.5 अंश सेल्सिअसने वर जाण्यास रोखण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत एक आंतरराष्ट्रीय समझोताही झालेला आहे. मात्र तापमान जितके अधिक घटेल तितका हवामान बदलाचा परिणाम कमी होईल. संशोधकांच्या मते पुढील दशकात तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. तापमानवाढीमुळे समुद्राच्या स्तरात वाढ होत आहे, जंगलांमध्ये वणवे लागत आहेत आणि ग्लेशियर्स वितळू लागली आहेत. मॉर्गन गुडविन हे प्लॅनेटरी सनशेड फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की सध्या डीकार्बोनायझेशन रणनीतींची गरज आहे. जगात जीवाश्म इंधनांचा वापर वेगाने कमी झाला पाहिजे.

कशी आहे योजना?

सूर्याची उष्णता रोखण्यासाठी अंतराळात एक मेगास्ट्रक्चर बनवले जाईल, जे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यानच्या 'लँग्रेज-1' पॉईंटवर असेल. ज्यावेळी ते तयार होईल त्यावेळी त्याच्याकडून सूर्याचा बहुतांश प्रकाश अंतराळात पुन्हा परावर्तित केला जाईल. अशा प्लॅनेटरी सनशेडची निर्मिती ही केवळ कल्पना नसून ती खरोखरच वास्तवात उतरवता येणे शक्य असल्याचे प्लॅनेटरी सनशेड फाऊंडेशनचे म्हणणे आहे. सध्या अंतराळाशी संबंधित तंत्रज्ञान वेगाने बदलले आहे. त्यामुळे अंतराळवीरांना किंवा सामग्रीला अंतराळात पाठवण्याच्या कामात खर्च तुलनेने घटला आहे. त्यामुळे अंतराळात अशा सनशेडची निर्मिती करणे शक्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news