Ulhasnagar firing case: गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण मात्र काळजी करण्यासारखी परिस्थिती-पालकमंत्री शंभूराजे देसाई

Ulhasnagar firing case
Ulhasnagar firing case

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले कल्याणचे शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. महेश गायकवाड यांच्याशी प्रत्यक्ष बोलता आले नाही. मात्र त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून आपण माहिती घेतली असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले. दुसरीकडे कायदा कायद्याचे काम करेल, पोलीस पोलिसांचे काम करतील, कोणताही मंत्री तपासात हस्तक्षेप करणार नाही असेही यावेळी शंभूराजे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. (Ulhasnagar firing case)

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यात गोळीबार झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्यातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. (Ulhasnagar firing case)

यावेळी देसाई यांनी महेश गायकवाड यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ महेश गायकवाड यांना पाहिले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला सांगितले की गायकवाड यांना योग्य ते उपचार दिले जात आहे. डॉक्टर सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.  (Ulhasnagar firing case)

तसेच याप्रकरणात कायदा त्यांचे काम करेल पोलीस त्यांचे काम करतील. पोलीस किंवा कायद्याच्या कामात सरकार अथवा त्यातील कोणताही मंत्री कसलाही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले. माजी यांनी गोळीबाराचे फुटेज बाहेर आलेच कसे असा आरोप केला आहे. यासंदर्भात शंभूराजे देसाई यांना विचारले असता मला याबाबत काही माहिती नाही. मी माझ्या मतदार संघात होतो. त्यानंतर थेट ज्युपिटर रुग्णालयात आलो असून यासंदर्भात माहिती घेतल्यानंतरच यावर भाष्य करणार असल्याचे सांगत या प्रकरणावर अधिक बोलणे शंभूराजे देसाई यांनी टाळले. महेश यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तर पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. हा गोळीबाराचा प्रकार खेदजनक असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news