पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया -युक्रेन युद्ध आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनसह युरोपमधील १८ देशांना तब्बल २ अब्ज डॉलरची संरक्षण सहाय्य देण्याची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केली आहे. अमेरिका प्रशासन युक्रेन आणि त्याच्या शेजारील १८ देशांना दीर्घकालीन सैन्य सहाय्य करण्यासाठी दोन अब्ज डॉलर देणार आहे. हे देश अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो ) संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्यावर भविष्यात रशियाकडून हल्ला होवू शकतो, यामुळे ही मदत देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
युक्रेनला संरक्षण सामुग्रीसाठी यापूर्वी ६७५ मिलियन डॉलरचे पॅकेज मिळाले असल्याची घोषणा युक्रेनचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी जर्मनीमधील एका संमेलनात केली. युक्रेनने देशातील दक्षिण भागात रशियाला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आता युद्ध भूमीवर आम्हाला यश मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला . यावेळी अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो ) संघटनेचे महासचिव जेन्स स्टॅलटेनबर्ग उपस्थित होते. बायडन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला तब्बल १५.२ अब्ज डॉलरची मदत केली आहे.
रशिया -युक्रेन युद्ध मागील काही दिवसांमध्ये पुन्हा तीव्र झाले आहे. युक्रेनच्या लष्कराने दक्षिण आणि पूर्व भागात रशियाने कब्जा केलेला परिसर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रत्युत्तर देणे सुरु केले आहे. आम्ही रशियाने ताब्यात घेतलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेवू, असा विश्वास युक्रेनकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :