पुढारी ऑनलाईन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना मंत्रिमंडळातून हटवले आहे. सुएला ब्रेव्हरमन ह्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. दरम्यान, सुनक यांनी ब्रेव्हरमन यांच्या जागी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे वरिष्ठ नेते जेम्स क्लेव्हरली यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पॅलेस्टाईन संदर्भातील वक्तव्यावरुन सुएला ब्रेव्हरमन यांना मंत्रिमंडळातून हटवल्याचे समजते. ब्रेव्हरमन यांच्यावरील कारवाईनंतर सुनक मंत्रिमंडळात फेरबदल केला आहे. याबाबतचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
संबंधित बातम्या
तर माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची सरकारमध्ये आश्चर्यकारकपणे वापसी झाली असून त्यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले आहे.
लंडन पोलिसांची भूमिका पॅलेस्टिनी समर्थनार्थ आहे. पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांना हाताळताना लंडन पोलिसांची भूमिका पक्षपाती होती, असा आरोप ब्रेव्हरमन यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. सुनक यांचे मत न घेता ब्रेव्हरमन यांनी पोलिसांच्या कृतीवर टीका केली होती. पॅलेस्टाईन समर्थक निर्देशने करत असताना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांची ही भूमिका पक्षपाती होती, असा त्यांना आरोप केला होता.
त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. शनिवारी झालेल्या मोर्चादरम्यान पॅलेस्टाईन समर्थकांना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले त्यावर ब्रेव्हरमन यांनी हल्लाबोल केला होता. त्यांनी याबाबत एक लेखदेखील सुनक यांच्या मान्यतेशिवाय लिहिला होता.
काही दिवसांपूर्वी ब्रेव्हरमन यांनी गाझामध्ये युद्धविरामाची मागणी करणाऱ्या लोकांच्या मोर्चाचे वर्णन "हेट मार्चेस" असे केले होते. आयरिश रिपब्लिकन गटांच्या निषेधाचा संदर्भ देत त्यांनी म्हटले होते की पॅलेस्टिनी समर्थकांची निदर्शने ही काही गटांद्वारे विशेषत: इस्लामिक दहशतवादी, "आम्ही उत्तर आयर्लंडमध्ये पाहिली आहेत," असे त्यांनी नमूद केले होते.
त्यांच्या या भूमिकेमुळे तणाव वाढला आणि यामुळे उजव्या विचारसरणीचे लोक लंडनच्या रस्त्यावर उतरले होते. यामुळे ब्रेव्हरमन यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी सुनक यांच्यावर दबाव वाढला होता.
ब्रेव्हरमन यांच्या जागी गृहमंत्रीपदाची जागा कोण घेणार? याची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती केली होती. पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक ईमेलवरून अधिकृत दस्तऐवज पाठवल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी ऋषी सुनक यांनी त्यांना पुन्हा पदावर नियुक्त केले होते.