Britain Political Crisis : ब्रिटनमध्ये पुन्हा राजकीय गोंधळ! लिझ ट्रस यांचे पंतप्रधान पद धोक्यात

Britain Political Crisis : ब्रिटनमध्ये पुन्हा राजकीय गोंधळ! लिझ ट्रस यांचे पंतप्रधान पद धोक्यात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Britain Political Crisis : ब्रिटनला महागाईचा तडाखा बसला असून महिनाभरापूर्वी स्थापन झालेल्या नव्या सरकारला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. देशातील आर्थिक संकट आणि आर्थिक बाजारातील गोंधळ यामुळे संपूर्ण सरकार हादरले आहे. पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्यांच्याच कंझर्व्हेटिव्ह पक्षातून विरोध होत आहे. अशा परिस्थितीत, ट्रस यांचे प्रतिस्पर्धी ऋषी सुनक नवे पंतप्रधान होण्याची शक्यता तीव्र झाली आहे.

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच लिझ ट्रस यांना आपली खुर्ची वाचवणे कठीण जात आहे. अहवालानुसार, ब्रिटिश खासदार या आठवड्यात पंतप्रधान लिझ ट्रस यांची पंतप्रधान पदवरून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न करू शकतात. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे 100 हून अधिक खासदार ट्रस यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये अवघ्या महिन्याभरापूर्वी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. तितक्याच गतीने त्यांना आता पंतप्रधानपदावरून हटवले जाऊ शकते. गव्हर्निंग कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे 100 हून अधिक खासदार ट्रस यांच्या विरोधात समितीचे प्रमुख ग्रॅहम ब्रॅडी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत, असे डेली मेलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. आता त्यांची 'वेळ संपली आहे' हे ट्रसला सांगण्याचा प्रयत्न या पत्राद्वारे करण्यात आला आहे. (Britain Political Crisis)

ब्रिटनच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी क्वासी क्वार्टेंग यांची अर्थमंत्री पदावरून हकालपट्टी केली. क्वासी क्वार्टेंग यांच्यामुळे देशात आर्थिक अस्थिरता वाढत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यांनी सादर केलेल्या मिनी बजेटमध्ये कर कपातीमुळे पौंडमध्ये घसरण झाली. त्याचबरोबर सरकारी कर्जाचे व्याजदर वाढले. पक्षातील इतर नेते देखील कर-कपात आर्थिक धोरणांच्या विरोधात आहेत. हे धोरण श्रीमंतांना अनुकूल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Britain Political Crisis)

तथापि, सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्षातील बंडखोरी अजूनही संपलेली नाही. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की ऋषी सुनक यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या (लिझ ट्रस) कर कपात धोरणांबद्दल आधीच इशारा दिला होता. मात्र, सरकारच्या करकपातीच्या निर्णयानंतर सुनक यांनी मौन बाळगले. या आठवड्यात सुनक यांनी लंडनच्या एका हॉटेलमध्ये दोन पूर्व-नियोजित पार्ट्यांचे आयोजन केले होते. यात त्यांनी रेडी फॉर ऋषी नेतृत्व मोहिमेचे आणि यूके ट्रेझरी अधिकार्‍यांचे आभार मानले.

सुनक हे सर्वात आवडता चेहरा

सुनक यांच्या एका मित्राने 'द संडे टाइम्स'च्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांच्या मौनाला अर्थ आहे. हा दृष्टिकोनाचा एक भाग आहे. यावरून असे दिसून येते की कर कपात रोखण्याचा इशारा अशा प्रकारे देण्यात आला नव्हता. सुनक परिस्थितीची जाणीव करून देत होते. त्याचबरोबर ब्रिटनमधील ताज्या राजकीय घडामोडींनंतर सट्टाबाजारही चांगलाच तापला आहे. ऋषी सुनक (42 वर्षे) हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याची चर्चा रंगली आहे. बुकमेकर एग्रीगेटर ऑडशेकरने 47 वर्षीय ट्रस यांच्या जागी सुनक यांना पसंतीचा चेहरा म्हणून सूचीबद्ध केले आहे.

सुनक यांनी राजकीय गोंधळापासून अंतर ठेवले

वृत्तसंस्थेनुसार, सुनक यांची टीम ब्रिटीश राजकारणातील सर्वात उल्लेखनीय राजकीय पुनरागमनाकडे लक्ष देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये जन्मलेले भारतीय वंशाचे राजकारणी सुनक सध्या राजकीय गोंधळापासून दूर आहेत आणि आपल्या मतदारसंघात वेळ घालवत आहेत. आपल्या संसदीय मित्रपक्षांमध्ये स्पष्टपणे आघाडीवर राहिल्यानंतर टोरी सदस्यत्वाच्या मतदानात सुनक यांचा पराभव झाला. मात्र, तरीही सुनक यांच्याकडे सर्वांची पसंती म्हणून पाहिले जात नाही. कारण यापूर्वी ते माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या छावणीचे कट्टर समर्थक होते. नंतर त्यांनी जॉन्सन यांच्याच विरुद्ध बंड केले आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news