UK Baby With Three DNA : इंग्लंडमध्ये तीन लोकांच्या डीएनए पासून झाला मुलाचा जन्म; जाणून घ्या कसे झाले शक्य

UK Baby With Three DNA : इंग्लंडमध्ये तीन लोकांच्या डीएनए पासून झाला मुलाचा जन्म; जाणून घ्या कसे झाले शक्य

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडमध्ये अशा प्रकारची पहिलीच घटना समोर आली आहे, ज्यामध्ये तीन लोकांच्या डीएनएने मुलाचा जन्म झाला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (Baby born from three people's DNA in UK) यूकेमध्ये प्रथमच तीन लोकांच्या डीएनएद्वारे बाळाचा जन्म झाला आहे. या प्रक्रियेत, 99.8 टक्के डीएनए दोन पालकांकडून आले आहेत आणि बाकीचा जन्म देणाऱ्या महिलेचा आहे. माइटोकॉन्ड्रियल रोग (mitochondrial diseases) टाळण्यासाठी ज्या तंत्राचा वापर केला जातो त्या तंत्राने या मुलाचा जन्म झाला आहे. (UK Baby With Three DNA)

काय आहे माइटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट ? (What is mitochondrial donation treatment (MDT)(UK Baby With Three DNA)

माइटोकॉन्ड्रियल डोनेशन उपचार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या तंत्रात, निरोगी महिला दात्याकडून एग्ज घेतले जाते. हे नंतर IVF भ्रूण तयार करण्यासाठी वापरले जातात, जे हानिकारक म्युटेशन पासून मुक्त असतात. जे पुढे ती आई कॅरी करु शकते आणि तिच्या मुलापर्यंत पोहचवू शकते. खरं तर, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की नवजात बालकांना या आजारापासून वाचवण्याचा हा एक यशस्वी मार्ग आहे. वास्तविक हा आयव्हीएफचा एक सुधारित प्रकार आहे. जे दुसऱ्या महिलेच्या एग्जमधून मायटोकॉन्ड्रिया घेते आणि मायटोकॉन्ड्रियल डोनर ट्रीटमेंट (एमडीटी) वापरल्यानंतर, आई फक्त पालकांचे डीएनए घेते.

माइटोकॉन्ड्रियल रोग म्हणजे काय ? (What is Mitochondrial diseases)

बीबीसीच्या या अहवालानुसार, माइटोकॉन्ड्रियल हा असाच एक आजार आहे, जो जन्मानंतर काही दिवसात किंवा काही तासांत प्राणघातक ठरू शकतो. हा रोग जन्म देणाऱ्या मातेकडून हस्तांतरित होतो आणि याचा धोका कमी करण्यासाठी, माइटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट वापरले जाते. (UK Baby With Three DNA)

या मुलाचा जन्म इंग्लंडच्या ईशान्येकडील न्यूकॅसल येथील एका क्लिनिकमध्ये या मुलाचा जन्म झाला.

कसे बाळ असेल

मुलाकडे त्याच्या आई आणि वडिलांचे आण्विक डीएनए असेल, म्हणजे व्यक्तीमत्त्व आणि डोळ्यांच रंग ही वारशातून मिळणारी वैशिष्ट्ये तो त्यांच्या आई- वडिलांकडूनच घेईल. याव्यतिरिक्त, त्यात महिला दात्याने प्रदान केलेला माइटोकॉन्ड्रियल डीएनएचा अल्पसा समावेश असेल.

माइटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंटच्या सहाय्याने मुले जन्माला घालणारा करणारा UK हा पहिला देश नाही. या तंत्राद्वारे जन्मलेल्या पहिल्या मुलाचा जन्म २०१६ मध्ये अमेरिकेत उपचार घेत असलेल्या जॉर्डनच्या कुटुंबात झाला होता.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news