UFO : पृथ्वीच्या कक्षेत हजारो उडत्या तबकड्या

UFO : पृथ्वीच्या कक्षेत हजारो उडत्या तबकड्या

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकन लष्कराच्या अंतराळ दलाने यूएफओचा (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट/उडत्या तबकड्या) मागोवा घेण्यासाठी एक कृती योजना तयार केली आहे. अंतराळातून अमेरिकेला धोका उद्भवू नये, हा या योजनेचा हेतू आहे. महिनाभरात अशा हजारो तबकड्या अमेरिकन अंतराळ दलाला आढळून आल्याने कृती योजना युद्धपातळीवर राबविली जात आहे. (UFO)

अमेरिकन अंतराळ दलाच्या अगदी अलीकडच्या एका अहवालात पृथ्वीच्या कक्षेत हजारो यूएफओ अस्तित्वात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटनच्या डेली मेलने याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेवर असलेल्या अंतराळातही असे घटक अमेरिकन अंतराळ दलाला आढळून आलेले आहेत. मात्र या घटकांचे प्रमाण इतके जास्त आहे की, धोका असलेले घटक नेमकेपणाने ओळखणे आणि ते निष्क्रिय करणे किंवा नष्ट करणे अमेरिकेलाही अवघड आहे. (UFO)

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना 2019 मध्ये अंतराळ दलाची स्थापना झाली होती. रडारवर अस्पष्ट उमटणे, प्रचंड वेग अशी काही लक्षणे रहस्यमय यूएफओबाबत अमेरिकन अंतराळ दलाने ठरविली आहेत. हवा, समुद्रासह अंतराळात उडण्याची क्षमता हेदेखील एक लक्षण आहे. अशा लक्षणाचे यूएफओ अमेरिकन अंतराळ दलाला आढळले आहे किंवा कसे, त्याबद्दल मात्र अहवालात काहीही नमूद नाही. तबकड्यांपैकी काही परग्रहवासीयांशी संबंधित असू शकतात किंवा कसे, त्याबाबतही अहवालातून काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. अर्थात तशी शक्यता अंतराळ दलाशी संबंधित काही निवृत्त अमेरिकन अधिकार्‍यांनी यापूर्वी वर्तविली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news