Udupi College Video Case | उडुपी कॉलेज टॉयलेट व्हिडिओप्रकरणी तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल

Udupi College Video Case | उडुपी कॉलेज टॉयलेट व्हिडिओप्रकरणी तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Udupi Toilet Video Case : कर्नाटकातील उडुपी शहरात असलेल्या 'पॅरामेडिकल कॉलेज'च्या टॉयलेटमध्ये एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आयपीसीच्या कलम 509, 204, 175, 34 आणि आयटी कायद्याच्या कलम 66(ई) अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये तीन विद्यार्थिनी आणि कॉलेज प्रशासनाला आरोपी करण्यात आले आहे.

मुलींचे खासगी व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तीन विद्यार्थीनींना कॉलेजमधून याधीच निलंबित केले आहे. ही घटना बुधवारी 19 जुलै रोजी उडुपी येथील अंबालपाडी येथील नेत्र ज्योती महाविद्यालयात घडली. रिपोर्ट्सनुसार, या तीन मुलींनी बाथरूममध्ये मोबाईल कॅमेरे लावले होते आणि त्यांच्यासोबत शिकणाऱ्या मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. (Udupi College Toilet Video Case)

रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, काही मुलांनी, ज्यांना तीन मुली हे व्हिडिओ पाठवत होत्या, त्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या मुली आणि उर्वरित विद्यार्थिनींमध्ये जोरदार वादावादी झाली. (Udupi College Toilet Video Case)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news